Friday 8 April 2011

विंडोज XP मध्ये लपविलेले प्रोग्रॅम्स्




आपण वापरत असलेल्या विंडोज XP मध्ये आपणास माहीत नसलेले अनेक प्रोग्रॅम लपविलेले असतात. हे प्रोग्रॅम सर्वांच्या उपयोगाचे नसल्याने ते लपविलेले असतात. आवश्यकतेनुसार हे प्रोग्रॅम त्या-त्या क्षेत्रातील जाणकार लोकांतर्फे वापरले जातात.


अशाचा काही विंडोज XP मध्ये लपविलेल्या प्रोग्रामची यादी खाली दिली आहे. यांचा वापर तुम्हाला त्या बद्दल चांगली माहिती असेल तरच करावा. कारण तुमच्या एखाद्या चुकीमुळे विंडोज मध्ये एखादा छोटा अथवा मोठा प्रॉब्लेम निर्माण होवू शकतो.

खाली दिलेले प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी विंडोजमधील स्टार्ट बटणावरील ' Run ' या जागेमध्ये खाली दिलेल्या प्रोग्रामच्या शॉर्टकट टाईप करून एंटर मारल्यास तो प्रोग्रॅम सुरू होईल.



१. Character Map - charmap (कि-बोर्डवर नसलेले अनेक निरनिराळी चिन्हे आणण्यासाठी)

२. Disk Cleanup - cleanmgr (कॉम्प्युटरमधील अनावश्यक फाइली नष्ट करणारा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

३. Clipboard Viewer - clipbrd (कॉपी केलेली गोष्ट पाहण्यासाठी तसेच साठविण्याचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

४. Dr Watson - drwtsn32 (विशिष्ट प्रोग्राममधिल प्रॉब्लेम शोधणारा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

५. DirectX Diagnosis - dxdiag (कॉम्प्युटरमधील साऊंड आणि विडिओ कार्ड बद्दलची माहिती पाहण्यासाठी ).
६. Private character editor - eudcedit (स्वतःचा नविन अक्षर तयार करण्यासाठीचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

७. IExpress Wizard - iexpress (आपणहून उघडणारा आणि इंस्टॉल करणारा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

८. Microsoft Synchronization Manager - mobsync (नेटवर्किंगमध्ये असलेल्या कॉम्प्युटरमधील फाइली ऑफलाईन असताना एकत्र करण्यासाठीचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

९. Windows Media Player 5.1 - mplay32 (विंडोज मेडिया प्लेअरचे जुने व्हर्शन सुरू करण्यासाठी)

१०. ODBC Data Source Administrator - odbcad32 (डेटाबेस संबंधीचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

११. Object Packager - packager (आपल्या कॉम्प्युटरमधील अंतर्गत व्यवस्थेची माहिती पाहण्यासाठीचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

१२. Registry Editor - regedt32 OR regedit (विंडोजमधील सॉफ्टवेअरच्या अंतर्गत नोंदी पाहण्यासाठीचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)  
१३. Network shared folder wizard - shrpubw (नेटवर्किंगमध्ये असलेल्या कॉम्प्युटरमध्ये देवाण-घेवाणीचा फोल्डर बनविण्यासाठी)

१४. File siganture verification tool - sigverif (कॉम्प्युटरमधील डिजीटल सिग्नेचर पडताळण्याचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

१५. Volume Contro - sndvol32 (वॉल्युम कमी-जास्त करण्याचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

१६. System Configuration Editor - sysedit (विंडोजमधील System.ini, Win.ini तसेच इतर फाइली उघडण्यासाठी)

१७. Microsoft Telnet Client - telnet (मायक्रोसॉफ्टचा टेलनेट प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

१८. Driver Verifier Manager - verifier (विंडोजमधील सॉफ्टवेअर तसेच हार्डवेअरच्या ड्राईव्हर फाइली पडताळणारा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)
१९. Windows for Workgroups Chat - winchat (जुन्या विंडोज एन.टी मध्ये नेटवर्किंग कॉम्प्युटरमध्ये चॅटींगसाठी वापरला जाणारा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

२०. System configuration - msconfig (विंडोजचे सुरुवातीला सुरू होणारे प्रोग्रॅम हाताळणारा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)

२१. Group Policy - gpedit.msc (विंडोजमधील काही विशिष्ट प्रोग्रामच्या सेटींग्स् बदलण्याचा प्रोग्रॅम सुरू करण्यासाठी)
  

No comments:

Post a Comment